Author Topic: साथ मला तु देशील का?  (Read 1171 times)

Offline Unknown_writer

  • Newbie
  • *
  • Posts: 3
साथ मला तु देशील का?
« on: November 10, 2017, 09:18:24 PM »
साथ मला तु देशील का?
❤❤❤❤❤❤❤❤
चांदणराती जागताना
शुभ्र चांदण्यात
मनसोक्त फिरताना
साथ मला तु देशील का?
रिमझिम पाउस बरसताना
अंगणात पडलेल्या गारा
ओजंळीत वेचून घेताना
साथ मला तु देशील का?
शब्द शब्द बाधंताना
अक्षराचीं कविता गुंफताना
सुरेल गीत छेडताना
साथ मला तु देशील का?
एकटीच चालते आहे मी
आयुष्याच्या ह्या वाटेवरी
हात हाती घेशील का?
घेईनी उंच भरारी तुझ्यासवे
आज साथ मला तु देशील का?
-Unknown writer

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: साथ मला तु देशील का?
« Reply #1 on: November 19, 2017, 05:16:35 PM »
Chan ahe
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]