Author Topic: तुझे नि माझे यमक जुळू दे  (Read 1020 times)

Offline sachinikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 174
 • Gender: Male
तुझे नि माझे यमक जुळू दे
« on: December 27, 2017, 05:28:21 PM »
तुझे नि माझे यमक जुळू दे                                 (१९/०८/२०१७)
 
तुझे नि माझे यमक जुळू दे
जगण्याला नवा अर्थ मिळू दे ।।धृ .।।
 
पुन्हा तुला भेटण्याचे हेच नवे बहाणे
तू जवळून जाताना हळूच चोरून पहाणे
वळून बघेपर्यंत तू तुला बघतच रहाणे
प्रेमाच्या सरींमध्ये डोळे मिटून नहाने
हाय... नजरेची भाषा नजरेला कळू दे
असेच ओठांवरती कायम हसू रुळू दे ।।१।।
 
साखरझोपेत येऊन साखरमिठीत घेना
मलमली स्पर्शाची चादर तू देना
मखमली क्षणांना थांबवून थोडे
जादुई दुनियेत अलगद तू ने ना
श्वासांचे अत्तर श्वासांमध्ये मिसळू दे
ह्या मनीचे गूज त्या मनी कळू दे ।।२।।


http://MK/
कवितासंग्रह: मुरादमन
कवी: सचिन निकम. पुणे.

sachinikam@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sachinikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 174
 • Gender: Male
Re: तुझे नि माझे यमक जुळू दे
« Reply #1 on: January 11, 2018, 04:29:35 PM »

Offline Hemlatapr

 • Newbie
 • *
 • Posts: 14
Re: तुझे नि माझे यमक जुळू दे
« Reply #2 on: January 14, 2018, 06:58:13 PM »
खूप छान कविता....अगदी भावनापूर्ण....दादा