Author Topic: फेसबुकवरच प्रेम  (Read 659 times)

Offline Dnyaneshwar Musale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Male
फेसबुकवरच प्रेम
« on: December 29, 2017, 09:14:08 PM »

असेल कशी तु याचा जीवाला मोठा घोर
तुला एकतरी msg करावा यावरच असे माझा जोर
अग ओळख आपली fb वरची
म्हणूनच चिंतेत असायची  माझ्या घरची,
आरश्यात बघुन खुदकन हसणं
नकळत रोज एकटच बसणं
यातचं सरायचा माझा दिस,
पाणावलेल्या मनानं खरच ग
 करायचो तुला लई मिस,
पोस्ट, comments तुझ्या वाचुनच
जणु भरायचं माझं पोट
अलगद मग तुझ्या प्रोफाइल
फोटो वर फिरायचं माझं बोटं.
तु हसली असेल कि रुसली
हे खोटारड्या स्माईली मात्र सांगायच्या
नवा अंकुर दाटुन मनात
तुझ्या msg च्या आठवणी खुप रांगायच्या,
आज नाहीतर उद्या तुला भेटेल
हीच एक होती माझी आशा,
पण तु फसवणार नाही ना यातच
व्हायची माझी निराशा,
तु माझी कि मी तुझा
हा प्रश्न नेहमी सतवायचा,
हरवलेला मी एक्कलकोंड्या
समजुन पुन्हा fb वर जीव गुंतवायचा.
खरचं पण कधी पाहिलं नाही तुला
तरी आठवण यायची मला,
पण खरं सांगु ब्लॉक करून तुला
 बरं झालं fb वरच घटस्फोट झाला.
नाहीतर तुच सांगत सुटली असती
कि तो आमुक आमुक पोऱ्या पार fb च्या आहारी गेला,
पण तु कधी बोलली नसतीस कोणाला
कि तो माझ्या प्रेमात पार वेडा झाला.

Marathi Kavita : मराठी कविता