Author Topic: निष्पाप मन  (Read 850 times)

Offline smeshram48

  • Newbie
  • *
  • Posts: 13
निष्पाप मन
« on: January 31, 2018, 11:57:43 AM »
 मनमोहक रुप तुझे
वसले मनी माझ्या
स्वप्नात सखे मला
स्पर्श होतो तुझा.

ह्रदयस्पर्शी नयन तुझे
आहेत हिरणी सारखे
आठवणीत तुझ्या माझ्यासंगे
रडतात, चंद्र व तारके.

कोमल केसात तुझ्या
वाटते सतत हात फेरावे
ओठांशी मिळवीत ओठ
मधुर चुंबन घ्यावे.

निष्पाप मन माझे
मनात तू अडकले
कारण याचे प्रिये
मन तुझ्या प्रेमात पडले.

Marathi Kavita : मराठी कविता