Author Topic: गारपीट  (Read 464 times)

Offline sagar dubhalkar

  • Newbie
  • *
  • Posts: 45
गारपीट
« on: February 13, 2018, 11:38:36 AM »
गारपीट 😭

काल अगदी अचानक
आला सोसाट्याचा वारा
मह्या शेतात बरसल्या
अशा भल्या मोठ्या गारा

काही सावरायच्या आत
त्यान शिवार व्यापल
उभ्या मह्या डोळ्यांम्होर
धन सगळच झोपल

मह्या गव्हाच र रान
हाती याचंच राहील
म्या अस कस धन्या
दृष्ट सपान पाहिलं

असा कसा देवा तू बी
मह्यावरच रागा भरतो
मी अन्न देतो सर्वां
अन म्याच सदा मरतो

#कवी - सागर दुभळकर
9604084846

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Parshuram Mahanor

  • Newbie
  • *
  • Posts: 31
Re: गारपीट
« Reply #1 on: February 13, 2018, 12:09:14 PM »
छान! कविता वास्तववादी आहे...!