Author Topic: ती गुलाबी होती  (Read 807 times)

Offline Balaji lakhane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 173
ती गुलाबी होती
« on: June 09, 2018, 06:47:26 PM »
------------ती गुलाबी होती-----------

ती माझी वाट गुलाबी होती,
अन् तिची साथ गुलाबी होती.!

तिच्या अन् माझ्या प्रेमाची,
यार ती बात  गुलाबी  होती.!

काळी सावळी थोडी नकटी,
मात्र ती फार गुलाबी होती.!

नष्ट केल्या मी प्रेमात जाती पाती,
ह्रदयात ती गुलाबी गुलाबी होती.!

लाजत वाचते ती कविता माझी ,
तिचीच कविता गुलाबी होती.!

मनात गुंतल्या मनाच्या गाठी,
ती अजन्म बंधने गुलाबी होती.!

डोळे लागताच ऒठावरचे तीळ,
वेडाच मी ती याद गुलाबी होती.!

---------बालाजी लखने(गुरू)--------
          उदगीर जिल्हा लातूर
          भ्र...८८८८५२७३०४

Marathi Kavita : मराठी कविता