Author Topic: कविता  (Read 868 times)

Offline kumudkadam

  • Newbie
  • *
  • Posts: 37
कविता
« on: July 05, 2018, 12:28:12 PM »
होशील का माझी अशी ?
झुगारून बंधने आहे तशी
सुखदुःख माझी मानून तुझीच अशी
देशील का साथ ? तुझी तशी


राहशील का हृदयात अशी ?
मोती वसतो शिंपल्यात तशी
होशील का सावली ? माझी अशी
पावलो पावली नित्य असते तशी


होशील का ओळख ? माझी अशी
नावाने नातं ओळखतात तशी
होशील का स्पंदने ? हृदयातील अशी
काट्यांची घडीच्या असतात तशी

Marathi Kavita : मराठी कविता