Author Topic: शोकांतिका प्रेमाची  (Read 904 times)

Offline Asu@16

  • Jr. Member
  • **
  • Posts: 246
शोकांतिका प्रेमाची
« on: July 11, 2018, 10:01:35 AM »
शोकांतिका प्रेमाची

तुझी बाहुली
माझा बाहुला
दोघांचं लग्न
की आपलंच स्वप्न !
आठवतं तुला ?
एकमेकांबरोबर
जगण्याच्या आणा भाका
चोरून दिलेल्या
चिठ्ठ्या चपाटया
थंडीची हुरहूर
पावसाची भुरभूर
आठवतं तुला ?
इतक्या वर्षांनंतर
तू भेटली
मैत्री आपली
अजून जपली
आठवणी काढून
खळखळून हसलो
एकमेकांना
फसवित राहिलो.
आपण किती वेडे असतो
खोटं लग्न लावून
हसत असतो
आणि
खरं लग्न लावून
रडत बसतो.
डोळ्याच्या पाण्याचा
अंदाजच नसतो.

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Marathi Kavita : मराठी कविता