Author Topic: निशब्द  (Read 1853 times)

Offline Shubham Surjuse

  • Newbie
  • *
  • Posts: 5
निशब्द
« on: July 11, 2018, 05:18:40 PM »
प्रेम माझ्या मनातले, तुला सांगायला आलो।
शब्द तुझ्या ओठातले ऐकून, मीच निशब्द झालो।।

डोळे तुझे हसरे, गूढ काही सांगे।
बोलता बोलता केसाची बट, हळूच कानामागे।।

बोलताना मधेच स्मिथ करायची सवय तुला वेगळी।
त्यातून उदभवे सुंदर, मग गालावर खळी।।

त्या खळीमध्ये पडलाय, गुंतून जीव माझा।
तुझ्या या रुपामुळे, मज हृदयाला का व्हावी सजा।।

हृदयाची माझ्या अवस्था बोलण्याशिवाय, उपाय नाही काही।
तुला सांगण्याशिवाय मला, आता गंतव्य नाही।।

पण शब्दाला माझ्या, आजही वाचा फुटेना।
या जन्मात आपली भेट होईल, अस मला वाटेना।।


                                    ~इतिशुभम~

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Nataliez

  • Newbie
  • *
  • Posts: 3
Re: निशब्द
« Reply #1 on: July 18, 2018, 03:00:42 PM »
Are these forums built to share information and general inquiries?

Offline rushikeshnagargoje00

  • Newbie
  • *
  • Posts: 6
Re: निशब्द
« Reply #2 on: July 27, 2018, 10:38:18 PM »
इकडुन तिकडुन बोललो ,
कसा तरी धीर करुन.
ऐकुन उत्तर  तुझे,
गेला जीव माझा निघुन.