Author Topic: कळी  (Read 872 times)

Offline Dnyaneshwar Musale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 143
  • Gender: Male
कळी
« on: September 15, 2018, 10:15:52 AM »
तुझ्या पापणीची कळी
राणी
असे आभाळाची फळी.

तुझ्या संगतीत
किती दिस
पापणीचे ग सरले,
राणी
तु डोळ्या आड जाता,
ऐकलेच पाणी पापणीत उरले.

डोळ्याची पापणी
 बोलते
पापणीला,
राणी
येणार नाही माघारी,
झिरपु नको तु,
मी हाय सोबतीला.

घेतला आता पुढाकार
एका पापणीनं,
राणीला
हुडकाया जायाचं परी,
जाता जाता पुन्हा
आली आठवांनी भरून सरी.

सांगाया आली मले
पापणी,
तुझी
राणी
काय आता तुले भेटेना,
डोळ्यात सलून बोले
पापनीच येड पापनीलाच
सुटेना.

ज्ञानेश्वर
8796454156

Marathi Kavita : मराठी कविता