Author Topic: आठवण....  (Read 2549 times)

Offline Vasanti

 • Newbie
 • *
 • Posts: 3
आठवण....
« on: October 26, 2018, 10:18:04 AM »

आठवण तुझी आली कधी,
तर हळूच पापण्या मिटून बघते,
सरलेल्या क्षणांचे संवाद,
जरा परत आठवून बघते!

आठवण तुझी आली कधी,
तुझ्या सोबत चालतांना रमते,
जुन्या आयुष्यातील रस्त्यावर,
आपल्या पावलांचा खुणा बघते!

आठवण तुझी आली कधी,
नेहमी प्रमाणे गाणी एकते,
प्रत्येक ओळीच्या प्रेमात नव्याने पडते,
प्रत्येक वाक्याचा सुंदर जगात जगते!

आठवण तुझी आली कधी,
चांदण भरलेल्या नभात बघते,
आपल्या आयुष्याचा न विसरणारा,
तो सुंदर प्रवास परत जगते!

आठवण तुझी आली कधी,
कारण नसतांना ही मंद मंद हसते,
प्रत्यक्षात न जगता येणाऱ्या क्षणांना हि,
स्वप्नात भरभरून जगते!

आठवण तुझी आली कधी,
डोळे बंद करून तुलाच
 मनभरून बघते,
तू समोर नसला जरी,
तरी तुझ्याच मिठीत असते!

आठवण तुझी आली कधी............

                                Vasanti...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,421
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आठवण....
« Reply #1 on: October 31, 2018, 04:28:12 PM »
छान.... :) :) :)

Offline sayu@viki

 • Newbie
 • *
 • Posts: 6
Re: आठवण....
« Reply #2 on: November 28, 2018, 03:54:54 PM »
खूप सुंदर !!
आठवण तुझी आली कधी....

                     आठवण तुझी आली कधी....
                     डोळ्याची  पापणी अलगद ओलावते ..
                     तू सोबत नाहीस म्हणून ,
                     पुन्हा तुझ्याच आठवणीत झुरते .... !!