Author Topic: प्रेम असाव अस  (Read 795 times)

Offline नितेश केसरकर

  • Newbie
  • *
  • Posts: 4
  • Gender: Male
प्रेम असाव अस
« on: May 04, 2019, 01:12:49 AM »
शीर्षक : प्रेम असाव अस

प्रेम असाव अस,
आकाशातल्या चंद्रासारखं.
अमावस्ये नंतरही,
शुभ्र लखलखनार...

प्रेम असाव अस,
आकाशातल्या सूर्यासारखं,
असंख्य वेदना नंतर तरही,
तेजस्वी तळपणार...

प्रेम असाव अस,
निळ्याभोर सागरासारखं.
खारट असल तरी,
संपूर्ण जग व्यापणार...

प्रेम असाव अस,
रंगबेरंगी फुलपाखरा सारख,
स्वछंद मनांन,
रानावनात भटकणार...

प्रेम असाव अस,
त्या उडणाऱ्या पक्षासारख,
कुठेही असल तरी,
घरट्याची ओढ असणार...

प्रेम असाव अस,
न सांगता कळणार,
न बोलता निभावणार...

स्वलिखीत
नितेश केसरकर
19/04/2019
- स्वलिखीत -
नितेश केसरकर

Marathi Kavita : मराठी कविता