Author Topic: सखे प्रेम तुझ्यावर  (Read 678 times)

Offline कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

  • Jr. Member
  • **
  • Posts: 90
  • Gender: Male
  • कविराज अमोल शिंदे पाटील
सखे प्रेम तुझ्यावर
« on: May 04, 2019, 11:03:31 AM »
*शीर्षक.सखे प्रेम तुझ्यावर*

खुप दिवसाच आहे
सखे प्रेम तुझ्यावर
नको डावलूस आता
विश्वास ठेव माझ्यावर

तुझ्या हसण्याचा रोग
मला झालाय असा
तू पाहिल्या पासून
चांदण पडत भर दिसा

तुझं लावण्य पाहून
नजर माझी बेभानली
पाहून ओठांची लाली
नशा शरीरात भिनली

तुझा स्पर्श हवासा
मिठीत ये ना जराशी
खूप दुरावा सोसला
घे आता तरी उराशी

राग मानू नकोस तू
मागणी घातल्याचा
दिस आठवत नाही
तुझ्यावीणा श्वास घेतल्याचा

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता