Author Topic: काय माहित कशी असेल ती  (Read 521 times)

Offline Aniket Patil

  • Newbie
  • *
  • Posts: 4
  • Gender: Male
  • I am single like 100% of my girlfriend
काय माहित कशी असेल ती
« on: May 06, 2019, 09:27:57 PM »
सुंदर नाजूक उठून दिसेल ती ,
गालावर सुरेखा खाली पाडून हसेल ती ,
करणा नसताना खोटीच रुसेल ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
एकुलती एक कि सर्वात थोरली असेल ती ,
नाहीतर कदाचित सर्वात धाकटी असेल
ती ,
संसार कसा सांभाळेल ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
फ्याशन करील की संस्कृती पळेल ती ,
परंपरा जोडेल कि परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
थोडी खट्याळ ,नखरेल ,लबाड असेल का ती ,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती ,
एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
एवढं छोटं आयुष्य सहज जगेल का ती ,
आभाळा एवढं दु:ख सहज सोसेल का ती ,
दु:खातही न तुटता हसेल का ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!
...............

- अनिकेत पाटील
९७६६१२१२८३

Marathi Kavita : मराठी कविता