Author Topic: आई  (Read 338 times)

Offline anandlaghate

  • Newbie
  • *
  • Posts: 2
आई
« on: May 07, 2019, 02:43:55 PM »
तुचं आयुष्याची सुरुवात आहे,
उदंड आयुष्याचा आशीर्वाद आहे।
मी बोललं ते पहिलं शब्द तू,
पहिला धडा, प्रारब्ध तू।

तूच घराचं आधारआहे, तु आहे तर संसार आहे।
माझ्यात तुझाअंश आहे,तुझ्या मुळेच तर वंश आहे।

स्वतः अस्वस्थ असूनही, माझी काळजी घेत असते।
बरं काही हवे असले तरी, तु नेहमीच देत असते।

कसं करते इतकं प्रेम निःस्वार्थ,
तुझी सेवा हेच खरं परमार्थ।

तु माझी पहिली गुरु, तुच आहे समीक्षक।
तु माझी पहिली मित्र, तुच मार्गदर्शक।

घरा बाहेर पडताना दह्याचा घास,
मी घरी आल्यावर जेवण खास।

कधी कौतुकाची थाप, कधी डोक्यावर प्रेमळ हात।
ह्या जगातील अंधारात, तु म्हणजे सोनेरी पहाट।

तु पूर्णिमे चा चंद्र, फुलांचा सुगंध।
तुझं प्रेम अमृत, तुझ असणं आनंद।

तु नसल्याने आयुष्य संपलं नसलं, तरी थांबलं आहे,
तुझ्या आठवणीत श्वास घेता, थोडं लांबलं आहे।

तू असल्याचा अजून सुद्धा भास आहे,
तुझ्या आठवणी आमच्या काळजात आहे।

जगणार तुझ्या आठवणीत आम्ही,
कारणं....
तुचं आयुष्याची सुरुवात आहे,
उदंड आयुष्याचा आशीर्वाद आहे।।

Kavi Anand Laghate

Marathi Kavita : मराठी कविता