Author Topic: कपाट  (Read 179 times)

Offline Sagar salvi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 105
कपाट
« on: May 21, 2019, 12:33:35 PM »
कपाटासारखं मन !
एक चावी तुझ्याकडे असेल
एक चावी माझ्याकडे,
तुझं कपाट माझ्याकडे ठेवेन
माझं कपाट तुझ्याकडे.

चांगल्या आठवणी ठेव समोर
वाईट कोपऱ्यात जमा कर,
दररोजच्या आठवणींची घडी घाल
काही लटकव हँगर वर.

कपाटात एक बनवून घेतलाय
गुपित खण असा,
उघडत नाही चावीने नुसता
लागतो तुझा ठसा.

सांभाळून ठेव कपाट माझं
नाजूक आहे फार,
कधी काळी त्याने सुद्धा
पेललेत खूप वार.

काही कप्पे उघडत नाहीत
काही उगाच जॅम झालेत ,
बाजारात म्हणे आजकाल
प्लॅस्टिक चेही कपाट आलेत.

काही आठवणी बरोबर नाहीयेत
नुसत्या कपाटाला छळतात,
काहींची झाली घुसमट की
कपाट सोडून पळतात.

Marathi Kavita : मराठी कविता