Author Topic: श्वास  (Read 387 times)

Offline Sagar salvi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 105
श्वास
« on: May 23, 2019, 06:54:48 AM »
श्वासाचा रस्ता !
अजून ही तो श्वासांचा आवाज
माझ्या कानात घुटमळतोय,
श्वासाची जागा विसरलाय बहुतेक
मनातल्या मनात गुदमरतोय.

श्वासाची आणि कानाची
होईल केंव्हा पुन्हा भेट,
कानाचा रस्ता लांब पडेल
ओठांवाटे भेटू थेट.

अजून ही फक्त विचाराने
धाक धुक मनाची होत राहते,
आत जाणारी ढीगभर हवा
मनाची स्थिती जवळून पाहते.

Marathi Kavita : मराठी कविता