Author Topic: वाटतंय तुला पाहून  (Read 417 times)

Offline D Ganesh

  • Newbie
  • *
  • Posts: 3
वाटतंय तुला पाहून
« on: May 24, 2019, 12:07:21 PM »

वाटतंय तुला पाहून
मी तुझ्या प्रेमात पडावं,
जे ऐकलंय प्रेमाबद्दल
ते गोड विष पिऊन पाहावं.

फक्त तुझ्या डोळ्यात
माझे मलाच पहावं,
त्यात समावून हे सारे
जग विसरावं.
वाटतंय तुला पाहून
मी तुझ्या प्रेमात पडावं.

फक्त तुझ्या केसांच्या
छायेत झोपावं,
झोपून आपलेच स्वपने पहावं.
वाटतंय तुला पाहून
मी तुझ्या प्रेमात पडावं.

माझ्या हातात तुझे हात
घेऊन चालत राहावं,
मी तुला अन तू मला
पहात राहावं.
वाटतंय तुला पाहून
मी तुझ्या प्रेमात पडावं.

Marathi Kavita : मराठी कविता