Author Topic: प्रीती  (Read 1597 times)

Offline sanjweli

  • Jr. Member
  • **
  • Posts: 95
प्रीती
« on: July 16, 2017, 10:05:18 PM »
१०/१२/२०१६

रातराणीचा गंध बाकी
रात जागी राहु दे
सैल ना कर मिठी जराशी
नीज ना मज येऊ दे
 
आस असीम मिलनाची
रंगात रंग मिसळू दे
भुलवू रे सांग कशी मी
व्हायचे ते होऊ दे

शेवटचा श्वास राही
जगण्याची बेफिकीरी दे
दिवास्वप्ने ती सारी
सत्यरुपी पुन्हा अवतरू दे

अजब ही ओढ प्रीतीची
हा देह निष्प्राण राहु दे
बेभान ओढ पतंगाची
मरणासक्त होऊ दे
©- महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
9422909143

Marathi Kavita : मराठी कविता