Author Topic: घर  (Read 1972 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 559
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
घर
« on: September 15, 2017, 08:08:19 PM »

म्हंटलं तर,
चार संरक्षित भिंती असते घर ,
प्रत्येकाचा मनात असते
आपापले घर

म्हंटलं तर,
गरिबाची झोपडीही असते घर ,
श्रीमंतीतले बंगलेही
साधेसुधे असते घर

म्हंटलं तर,
चार लाकडी मेकान् गवताचे छप्पर,
जनावरांचे असते गोठ्यातच घर

म्हंटलं तर,
मातीतलं निव्वळ एक बीळ,
महत्वाचे ते सुद्धा असते
क घर

म्हंटलं तर,
टांगलेला खोपा झाडावर
असेही एक घर असते
पक्ष्यांचे माळावर
« Last Edit: January 17, 2018, 07:07:29 PM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता