Author Topic: सादगीने हिमालयाच्या  (Read 1835 times)

Offline suryawanshirohit28

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
    • suryawanshirohit28.blogspot.in/
सादगीने हिमालयाच्या
« on: December 22, 2017, 01:03:34 AM »
सादगीने हिमालयाच्या,
अर्थ नवा जगण्याला मिळाला,
अडचणीवर मात करण्याचा,
मार्ग नवा सापडला...

कुरवाळून कुशी पर्वतांची,
उगम प्रवाहाचा व्हावा,
अस्तित्व स्वतःचे सिद्ध करण्यास,
प्रारंभ नव्याने व्हावा..
 
वाट नवी त्या प्रवाहास मिळाली,
आयुष्याची journey ही त्याच गतीने सर व्हावीशी वाटली...

साच्यात आयुष्याच्या,
बदल नव्याने झाला,
स्वभावानुरुप अनुसरणाची,
रीतच न्यारी बनली...
 
आठवणी पांघरून घेण्याची,
आस हृदयात आली,
क्षितिज समांतर आहेत कथा,
ही आशा मनी बाळगण्याची...

रोहित सूर्यवंशी , नाशिक
9767717036
-रोहित 
रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
9767717036

Marathi Kavita : मराठी कविता