Author Topic: मुजरा झुकून आहे !!  (Read 423 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 237
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
मुजरा झुकून आहे !!
« on: February 17, 2018, 06:08:20 PM »
मुजरा झुकून आहे !!
----------------
हृदयात भावनांचा मोगरा फुलून आहे
गझलेत शायरांचा मुजरा झुकून आहे
**
ते बोल तारकांचे तुजला कसे रुचावे
तो स्पर्श चांदण्याचा तुजला दुरून आहे
**
जपल्या आठवांना अजूनही किती जपावे
गंध पाकळ्यांचे अजूनही सुकून आहे
**
फार कष्टलास तू रे बघ लेकरांसाठी
वृद्धाश्रमात तू आज का पडून आहे
**
मुलगी म्हणतोस धनाची पेटी आहे
तरीही का परक्याचे धन अजून आहे
**
कसा मिळावा न्याय खऱ्या खोट्याला
न्याय देवता डोळ्यास पट्टी बांधून आहे
**
आपले मरण पाहिले आपल्या डोळ्यांनी
सैन्यात कौरवांच्या मामा शकून आहे
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
१०-०२-२०१८

Marathi Kavita : मराठी कविता