Author Topic: कितिदातरी ...!  (Read 388 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 240
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
कितिदातरी ...!
« on: March 19, 2018, 12:34:11 PM »
कितिदातरी ...!
--------------
मी मलाच भेटलो कितिदातरी
मी नव्याने फुटलो कितिदातरी
**
देता देता असेच देत राहिलो
असे लूटत राहिलो कितिदातरी
**
बेसुर असेल गाणे माझे जरी
सूरात गात राहिलो कितिदातरी
**
तू भेटलिस नाही जरी मला
झुरत राहिलो कितिदातरी
**
आकंठ बुडालो संसार सागरात
पोहत राहिलो कितिदातरी
**
एकदा घोट प्यायलो सुखाचा
तहानलेला राहिलो कितिदातरी
**
तू आहेस माझ्या अंतरी जरी
शोधित राहिलो कितिदातरी
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
१९-०३-२०१८


Marathi Kavita : मराठी कविता