Author Topic: पाहिजे  (Read 544 times)

पाहिजे
« on: November 12, 2017, 01:14:26 PM »
दुष्मन असला तरी
दुष्मनीत तो रुबाब पाहिजे

शब्दांची यारी होतं जाते
 पण सादर करण्याचा थाट पाहिजे

रोजचं लिहण्याची किमया होते
लिहण्यातला शब्द अर्थ पूर्ण पाहिजे

मैत्रीत रोजचं होतात वाद
समजून घेण्याची औकात पाहिजे

नात्यानं मधल्या दुराव्यांत
समजूत काढणारा तो यार पाहिजे

सौंदर्याचा गर्व असावा पण
त्या सौंदयाला जाणणारा पाहिजे

सौभाग्याचं लेन महत्वाचं आहे
पण सौभाग्य जपणारा पाहिजे

प्रेमाच्या वाटा विखुरलेल्या असतात
पण त्या वाटा जोडणारा दुवा पाहिजे


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता