Author Topic: सावकारी माज  (Read 421 times)

सावकारी माज
« on: November 15, 2017, 07:29:29 AM »
प्रयत्न करून गजल लिहायचं शिकलो

माझी पहिली गजल शेतकऱ्यांना साठी सावकारी विरोधात

गजल.क्र.१

वृत्त.मनोरमा..

लगावली...गालगागा गालगागा

शांत झाले रान आहे
झूकलेली मान आहे

देह सारा संपला रे
हेच सारे दान आहे

आज सारे घेतलेले
शेत त्याची शान आहे

मागलेली देयदारी
शांततेचे गान आहे 

सावकारी माज आहे
हीच सारी घान आहे


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता