गजल नं.२
वृत्त. आनंदकंद
लगावली.
गागाल गाल गागा , गागाल गाल गागा
भंगार होत गेलो,जातीत वाढल्यावर
गावात राहीलो ना,प्रेमात हारल्यावर
लोकात रोज मरतो गुंताच सोडताना
रातीस झोप नाही प्रेमात पाडल्यावर
माझे म्हणून येथे कोणास हाक मारू
वैरीच आज माझ्या दारात थांबल्यावर
घायाळ माय होते डोळ्यात पाहताना
मातीत प्राण गेला बापास गाडल्यावर
वैऱ्यास प्रेम देतो रागात बोलताना
जीवास जीव देतो मैञीत हासल्यावर
✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर