Author Topic: तूझ्या विना  (Read 658 times)

तूझ्या विना
« on: November 24, 2017, 11:07:11 AM »
*गजल क्र.६*

वृत्त.संयुक्त

मात्रा.१४


गागालगा गागालगा
 
माझ्या मनाने सोडले
 तूझ्या विना रे सोडले

स्वप्नांत सारे डाव हे
तूझ्या विना मी मोडले

संसार माझा सोबती
तूझ्या सवे मी जोडले

हे नाव माझ्या सोबती
तूझ्या विना मी खोडले

फ़ंद्यात साऱ्यांनी मला
तूझ्या विना रे ओढले

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता