Author Topic: हल्ली ?  (Read 396 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 240
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
हल्ली ?
« on: February 12, 2018, 02:33:03 PM »
 हल्ली ?

सांगा भरवसा कुणावर ठेवावा हल्ली ?
नाहीच उपकार कुणावर करावा हल्ली !
**
तू चांगल्याचे सांगण्या जाता
तो उफराटा का फिरावा हल्ली
**
मी सत्य काय ते सांगून गेलो
म्हणे यालाच फासावर चढवा हल्ली
**
थोडे सुखला बोलावू पाहता
कुणाला लागतो सुगावा हल्ली
**
घरात कुरबुर चाले पती-पत्नीची
का लागलीच " घटस्फोट" घडावा हल्ली
**
"आई विना भिकारी" नसे कलियुगी या
आई पण भाड्याने मिळावा हल्ली !
**
पैशाविना ना फाईल सरके सरकारी दरबारी
भ्रष्टाचार झाला "शिश्टाचार पाहावा हल्ली
**
प्रकाश साळवी
बदलापूर ठाणे

Marathi Kavita : मराठी कविता