Author Topic: गिरविला कित्ता कुणाचा?  (Read 600 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 240
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
गिरविला कित्ता कुणाचा?
« on: March 19, 2018, 12:38:16 PM »
गिरविला कित्ता कुणाचा?
--------------------
हा रस्ता पुसतो पत्ता कुणाचा?
खळग्यांचा हा रस्ता कुणाचा?
**
कधी ना म्हणतो चोरी केली
आज गिरविला कित्ता कुणाचा?
**
चावरे कुत्ते आहेत दावणीला
हा भुंकणारा कुत्ता कुणाचा?
**
ना जात ना पात माणसाला
तरी हा फिरतो जथ्था कुणाचा?
**
पडल्यात फाईली टेबलावरती
मग हा आला भत्ता कुणाचा?
**
आज ना कुणाचा वाढदिवस
आला चालत नाश्ता कुणाचा?
**
जो तो करतो ऑनलाईन खरेदी
कोण घेईल माल सस्ता कुणाचा?
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
१८-०३-२०१८

Marathi Kavita : मराठी कविता