Author Topic: तडका - सोनं शॉपींग  (Read 214 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - सोनं शॉपींग
« on: November 06, 2015, 06:47:50 AM »
सोनं शॉपींग

बघता-बघता हा हा करत
घरा-घरात बातमी पसरली
बायकोने सांगितले नवर्‍याला
सोन्याची किंमत घसरली

किंमत सोन्याची घसरल्या पासुन
बायकोचं वागणं-बोलणं पेटलं होतं
सोन्याची शॉपींग करावी लागेल
नवर्‍याने समजुन घेतलं होतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता