Author Topic: तडका - आनंदोत्सव साजरे करताना  (Read 177 times)

Online vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,491
आनंदोत्सव साजरे करताना

फटाक्यांच्या धुम-धडाक्यासह
टिकल्यांचाही थरथराट असतो
आसमंतालाही उज्वल करण्या
रोषनी पावसाचा सुरसुराट असतो

अशी हर्षभरित आतिषबाजी
घरा-घरातुन उधळली जाते
या निमित्ताने दिपावलीच्या
आनंदी काया उजळली जाते

पण आपल्या सुरक्षेच्या समस्या
आता आपल्यालाच कळाव्यात
अन् आनंदोत्सव साजरे करताना
प्रदुषणीय गोष्टी टाळाव्यात,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३