Author Topic: महाविद्यालये नंदुरबारातली  (Read 418 times)

Offline Krutik

  • Newbie
  • *
  • Posts: 2
सुटली ती शाळा केव्हाची
आलो मी महाविद्यालयात
मन लागत नाही कोणाचे
येथे अभ्यासात ||१||
बनले शत्रू सर्वांचे
जे करू देत नाही कॉपी
मुलांपेक्षा जास्त मुली
करू लागल्या कॉपी।।२।।
सर्वांच्या हातात जेव्हा
व्हाट्स ॲप आणि फेसबूक
तेव्हा लक्षात कसे राहील
न वाचता टेक्सबूक ।।३।।
हल्ली असते नजर
मुलांची फक्तमुलींकडे
तेव्हा साहजिकच होईल
दुर्लक्ष अभ्यासाकडे।।४।।
आल्यावर फेब्रुवारी
लागतात वेध बारावीचे
विचारलं की येत नाही
मागचे ते अकरावीचे।।५।।
जेव्हा येते परीक्षा
तेव्हा आठवतो अभ्यास
डोक्यावरून सर्व जाते
तेव्हा धरतात खिडकी ची आस।।६।।
जेव्हा कॉपी मद्ये मुली
मुलांपेक्षा जास्त
तेव्हा होत असेल लज्जेने
सावित्रीबाईंची आत्मा त्रस्त।।७।।
                 
                    poet Krutik Patel