Author Topic: तडका - सोयरिक फॅक्ट  (Read 171 times)

Offline vishal maske

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,566
तडका - सोयरिक फॅक्ट
« on: June 28, 2018, 08:08:26 AM »
सोयरिक फॅक्ट

सुन करायची म्हटलं की
शेतकामाला असावं वाटतं
मुलगी द्यायची म्हटलं की
शेतकामच नसावं वाटतं

सोयरिकीच्या बोला-चालीत
हा तर वास्तवी पगडा आहे
मुलगी-सुन समान वागवा
आमचा वैचारिक झगडा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता