Author Topic: थोडीशी प्यावीशी वाटते*  (Read 2322 times)

Offline Amit K

  • Newbie
  • *
  • Posts: 23
  • Gender: Male
☔🌧⛈🌩🌨🌩⛈🌨🌩🌧☔

*थोडीशी प्यावीशी वाटते*


     बरेच दिवस प्यायलो नाही
     आज प्यावीसी वाटते
     पावसाची पहीली सर
     ग्लासात घ्यावीशी वाटते!

ब्रॅन्डीचा एक पेक
गळी उतरावासा वाटतो
पावसाचा पहीला थेंब
मनी उतरावासा वाटतो!

     आज धुंद होत प्यावी
     थोडी अधिक घ्यावी
     सावरत सावरत स्वतःला
     पावसाची मजा घ्यावी!

जगाचा विचार सोडून
रस्त्यात जायचे पडून
गटार फुगुदे कितीही
आपल्यामुळे पाणी अडून!

     लोक म्हणतील 'बेवडा'
     आपण फक्त हसायचं
     हळूहळू उठायचं नि
     तोल गेला की बसायचं!

येणारे जाणारे बघतील
होईल थोडा हशा
पण पिल्यावरचं मिळते
पहिल्या पावसाची नशा!

      'ती नशा' नसानसात
      आज घ्यावीशी वाटते
      पहील्या पावसासाठी आज
      थोडीशी प्यावीशी वाटते!
                     
   
🥃पहील्या पावसाच्या तर्राट शुभेच्छा🥃

Writer :
Unknown