Author Topic: स्वयंवर  (Read 1747 times)

Offline dhanaji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 91
स्वयंवर
« on: November 03, 2015, 05:01:05 PM »

समोरच्या खिडकीमधून
किती वेळा पाहशील
कांदेपोहे तयार ठेवते
कधी बाबांना भेटशील


रोज सकाळी तयार होऊन
खिडकीत मीही डोकावते
माझ्या आईचे लक्ष असते
ती मला पकडते


तुला नसेल माहिती तुझी
एवढी मला असते
दादाला ती केंव्हातरी
मी बेधडक दाखवते


मी फक्त वाट पाहते
तुझ्या हिम्मतीची
हिरवा झेंडा माझ्याकडून
साद ही प्रीतीची


प्रिन राम म्हात्रे

Marathi Kavita : मराठी कविता


g s patil

  • Guest
Re: स्वयंवर
« Reply #1 on: December 03, 2015, 01:26:47 PM »
good poit live and leave