Author Topic: छोटी मोठी स्वप्ने  (Read 2502 times)

Offline कदम.के.एल

  • Full Member
  • ***
  • Posts: 559
  • Gender: Male
  • काहीतरी लिहावसं वाटलं.मला..अवचित..उमटल्या ओळी..झालो कवी ...नवोदित.
छोटी मोठी स्वप्ने
« on: August 09, 2017, 10:18:40 AM »

छोटी मोठी स्वप्नं
मी रंगवत असतो...
विचारांना मी मनातील
कृतीसवे गुंडाळत असतो...!!

प्रेमात ऊर गोठत असतो
आठवणींने एका वितळत असतो
घेवून आस तुझी भेटण्याची
दिवसामागून दिस लोटत असतो....!!

मनमुराद तुला आठवत असतो
विरह ऊरातून सोसत असतो
भास तुझा एक खास असतो
हाच रोजचा मला ञास असतो...!!
« Last Edit: November 29, 2017, 07:29:02 AM by कदम.के.एल. »

Marathi Kavita : मराठी कविता