Author Topic: मी पण अमिताभ बनलो असतो भाय  (Read 329 times)

Offline siddheshwar vilas patankar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 303
  • Gender: Male
  • siddheshwar patankar
मी पण अमिताभ बनलो असतो भाय

पण आपल्याला रोलच कधी मिळाला न्हाय  :'(

" अय साला " करून, डिट्टो करतो हाणामारी

स्टाईल आपली बघून येड्या होतात साऱ्या पोरी  8)

बिग बी ची ऍक्टिंग म्हणजे खाऊ वाटलं काय

उंची सोडली तर बाकी इथं सर्व ठीक हाय  :P

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

पण साला तसा रोलंच मिळाला न्हाय  :'(

शहेनशहा बनुन बाहेर पडलो एका काळ्याभोर रात्री

चमकणारा हात बघून लागली भरपूर मागे कुत्री  :mad:

लटपट लटपट धावत होतो जणू अग्निपथावरती

जंजीर धरुनी दिवार चढलो मग पडलो तोंडावरती  :angel:

तोंड फुटुनी पार सुजले , आला गळ्यात माझ्या पाय

मी पण अमिताभ बनलो असतो भाय  :-[

पण काय करू , आता पाय गळ्यात आलाय भाय

नायतर नक्की बनलो असतो बिग बी भाय  ;D ;D ;D
सिद्धेश्वर विलास पाटणकर C