Author Topic: सध्या  (Read 297 times)

Offline कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

  • Jr. Member
  • **
  • Posts: 101
  • Gender: Male
  • कविराज अमोल शिंदे पाटील
सध्या
« on: July 15, 2019, 04:09:08 PM »
*शीर्षक.सध्या*

तुझं कोणाशी म्हणे पटत नाही सध्या
पाहिलं तर तुझं वजन घटत नाही सध्या

कसलं माझं नशीब फुटक आहे बघा
तिला गवारीच्या शेंगा तुटत नाही सध्या

म्हणे तुझ्याकडं तसलं मशीन आहे जणू
तू मसाला बी साधा कुटत नाही सध्या

तू नटतेस रोज रोज गावात मिरायला
साधा चोर पण तुला लुटत नाही सध्या

खाऊन खाऊन फुगलीस म्हशी सारखी
तुझ्या टेन्शन पाई दारू सुटत नाही सध्या

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Marathi Kavita : मराठी कविता