Author Topic: आठवतेस का पुन्हा !!  (Read 1060 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 237
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
आठवतेस का पुन्हा !!
« on: August 30, 2018, 10:16:56 AM »
खपली काढावया व्रणाची आठवतेस का पुन्हा
जीव कासाविस माझा आठवतेस का पुन्हा
**
अशास्वत वादळाचे अस्तित्व मी नाकारत नाही
जगण्याचे वादळ करण्या आठवतेस का पुन्हा
**
ईतिहास आठवांचा आता पुसून जात आहे
जखमा सखोल करण्या आठवतेस का पुन्हा
**
होतो आपण कधीकाळी नभात विहरणारे पक्षी
पंख छाटण्यासाठी आता आठवतेस का पुन्हा
**
होते थोडे काही साठवले तुझ्या प्रीतीचे तराणे
आयुष्याला शून्य करण्या आठवतेस का पुन्हा
**
आठवतात अजूनही धुंद करणाऱ्या चांदराती
स्वप्ने पाहिलेली आठवण्या आठवतेस का पुन्हा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२ ५६०५४

Marathi Kavita : मराठी कविता