Author Topic: गाठोड !  (Read 395 times)

Offline dhanaji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 91
गाठोड !
« on: November 03, 2015, 05:02:55 PM »

आज सकाळी माळा साफ करताना ना
अडगळीत एक आठवणीच गाठोड
सापडलं .............
हावरटा सारख पटापटा गाठोड सोडून
एक एक आठवण बाहेर काढली
अगदी रमून गेले रे त्या आठवणीमध्ये
एक एक करून गाठोड रिकाम झाल
पण तुझी एकही आठवण
नाही लागली हाताला
विश्वासच बसेना पुन्हा पुन्हा
गाठोड झटकून पाहिलं
पण छे नाहीच मिळाली एकही ............
जीव अगदी कासावीस झाला बघ
डोळ्यात पाऊस दाटून आला
बरसणारच होता धो धो ......
तेवढ्यात कुठूनतरी आवाज आला
"अग वेडे ! काय शोधतेस त्या गाठोड्यात ?
आणि डोळ्यात हा पाऊस का दाटलाय ?
तुला त्या गाठोड्यात त्याची
आठवण भेटायला तू त्याला
विसरायला तर हवस आधी !!!!!!!!!!


सौ ज्योत्स्ना राजपूत
पनवेल

Marathi Kavita : मराठी कविता