Author Topic: '' गहाण मी ''  (Read 661 times)

'' गहाण मी ''
« on: November 11, 2015, 04:35:38 PM »
वादळानंतरची शांतता भयाण मी...
तुझ्या प्रेमाची अतृप्त तहान मी...

चोहीकडे विरहाचे रखरखते उन...
तुझ्याविना भदाडलेल रान मी...

नकोस दाखवू आशा पालवी फुटण्याची...
फांदीपासून अलिप्त झालेलं पान मी...

चांगुलपणाची सुमने तुझ्या पदरी...
जमिनीखाली गाडलेली घाण मी...

नित्य नवीन अस तुझ जीण...
धूळ खात पडलेलं एखाद पुराण मी...

तुझे शब्द मी अजुनी टपोऱ्या थेम्बागात वेचतो...
पान तुझ्यासाठी रटाळ गाऱ्हाणं मी...

तुझी प्रीत पदरी पडलीच नाही...
ठेविले जरी सर्वस्वी गहाण मी...

........... @गोविंदराज@

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sindu.sonwane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 98
  • Gender: Female
Re: '' गहाण मी ''
« Reply #1 on: November 15, 2015, 06:03:06 PM »
khup chan