Author Topic: "एकांत आणि आठवणी"  (Read 958 times)

Offline Hardik

  • Newbie
  • *
  • Posts: 3
"एकांत आणि आठवणी"
« on: January 20, 2018, 09:54:46 PM »
होतो जसा काल मी
आजही तसाच आहे |
कालही एकटाच होतो
मी आजही एकटाच आहे ||
आज काल इथे आम्ही दोघच असतो
‌माझा एकांत आणि मी ,
तासन तास दोघं बोलत बसतो
आठवणींच्या विश्वात हरवत असतो...
आठवणीचे विश्वात तुला शोधता शोधता
पापण्यात पाणी दाटून येते..||
शेवटी मनाला हेच समजावतो ,
जीवन हे असच जगायचं असतं
दुःख घेऊन सुख वाटायचं असतं ..
जीवन - मरण हे फक्त कोड आहे
‌जाता - जाता हे सोडवायचं आहे......|||
      Hardik D. Shah
           Mumbai
« Last Edit: January 20, 2018, 10:06:16 PM by Hardik »

Marathi Kavita : मराठी कविता