Author Topic: "निरोप घेतो, तुमचा आता”  (Read 748 times)

Offline haresh1979

  • Newbie
  • *
  • Posts: 16
"निरोप घेतो, तुमचा आता”
« on: December 31, 2018, 02:25:40 PM »
"निरोप घेतो, तुमचा आता”


"निरोप घेतो, तुमचा आता,
पुन्हा न येणे परत आता,
एकवारच केवळ येतो मी,
सुख - दुःखाची साठवण घेऊन मी,
कितीक जन्मास आले अन, कितीक मावळले,
कितीकजण बोलकेही झाले,
अन कितीकजण अबोल ही झाले,
सुखाच्या घटनांनी, हास्य ओठांवरी दिले,
अन दुःखाच्या घटनांनी अश्रूही डोळ्यांवरी तरळले,
कोणाचे आयुष्य  बदलून गेले तर,
कोणाचे अस्थित्वच दबून गेले,
न श्रम करीत भेटले वैभव दिले कोणाला,
परी घाम गाळून न दमडी ही दिले कोणाला,
असा हा प्रवास घडविला तुम्हाला ,
चूक भूक झाली तरी माफी द्यावी मजला,
आता कधीही न येणे तव आयुष्यात,
परी करा स्वागत त्याचे (२०१९) तुम्ही तुमच्या आयुष्यात.."


-हरेश ( शेखर ) विजय झरकर, ३१/१२/२०१८, १४:१९.


Marathi Kavita : मराठी कविता