Author Topic: कोठेतरी अंत आहे  (Read 982 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
कोठेतरी अंत आहे
« on: November 02, 2015, 07:45:04 PM »

कोठेतरी अंत आहे .....


कोठेतरी तुला दुखावल्याची
मला आता उगाच खंत आहे


माझ्या ह्या अश्या वागण्याचा
मनाचा माझ्या आकांत आहे


चूक माझीच होता नको ते वदलो
पण तू अबोल सोसत किती शांत आहे


तू होती शीतल नक्षत्र तारका
मी मात्र तळपता सुर्यकांत आहे


तांडव कोणी मांडले नभांत उगाच
ती वीज आता का ढगाआड शांत आहे


शेवटाला ना जिंकले कधी कोणी
क्षितीजालाही कोठे तरी अंत आहे


Sunil Khandekar

Marathi Kavita : मराठी कविता