Author Topic: पुणे-मुंबई एक अधूरी प्रेमकहानी  (Read 707 times)


कवी:तुषार भारती.....पुणे

(पुण्या-मुंबई च्या lovestory मध्ये एक लव्हस्टोरी अशीही होती, जिला पुण्याच्या बाजूने प्रेमाचा ओलावा जरूर होता, पण मुंबईच्या बाजूने वासनेची किनारही होती..
म्हणून
देवाने ही lovestory अर्धीच लिहली होती, हे तिचं दुर्दैव आणि माझं नशीब होतं....)

बघ पुन्हा पुण्या-मुंबई ची जोड़ी हिट झाली
त्या ह्रदयमर्दम ला त्याची जोड़ीदार मिळाली..

तुलाही लाभले असते असेच घरंदाज भाग्य
स्वार्थीपनाची पुसट लकेर जर उमटली नसती
चालून आलेली संधी तू सहज पने डावलली नसती
तुझी ती तहान तू निमुटपने भागवली नसती..!!

तुलाही लाभली असती ती शान
पुणेकर म्हणुनी चारचौघात मिरवण्याचा तो मान,
जर आलेले अश्रु पुसन्यासाठी तू माझाच हात वापरला असता
स्वतःला सावरण्यासाठी जवळचा कोणताही सहारा घेतला नसता....!!

तुलाही लाभली असती दिवाळीत माहेरची ओढ़
भाऊबिजेला तुही नेले असते पुणेरी करदुड्याचे ते दोन जोड़
जर तुझ्या अंगात नसती अशी वासनेची खोड
प्रेमाचे नाव देऊन केले नसते तू कधी नाती ही माती-मोल....!!

तुलाही लाभला असता तोच आत्मसन्मान
तुझ्या "परी" पुढेही असती तुझी ताठ मान
जर
थोड्याशा सुखासाठी तु स्वतःला वीकले नसते
मित्रमैत्रिणित मिरवन्यासाठी जवळचा कोणी उसने घेतले नसते...!!

अल्लड असतो गं आम्ही पुणेकर तितक्याच् निस्वार्थी पणाने प्रेम करतो
आपल्या माणसांसाठी भांडतो, आपल्याच माणसांसाठी रडतो...
तुम्ही घाटी म्हंणता ना.. आम्ही त्यालाच आमचा रुबाब म्हणवितो....!!

....╔══════════ ═
════════════╗
·•·.·´TUSH¯`·.•·
अनामिक ♫♪
·•·.·´¯`·.•·
╚════════════ ════════════╝
(¯` ´¯)
`•.¸T.•´
☻/
/▌ ..

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):