Author Topic: खोटे स्वप्न...  (Read 771 times)

Offline shetye_pranav

  • Newbie
  • *
  • Posts: 7
खोटे स्वप्न...
« on: November 15, 2015, 02:25:22 PM »
निद्रेस जाता पडतो विसर जगाचा,
मधुस्वप्न पडो तुझे, हाच विचार मनाचा.

धुंद या स्वप्नी तुझे रूप न्याहाळत होतो,
तू जवळी येता, तुझ्या हरवून जात होतो.

तारुण्य या डोळ्यांचे, जादू हि तुझ्या रुपात,
लाजल्या या पापण्या पाहता एक क्षणात.

कांती हि लखलखती, देवाचा हा वर,
पडे गालावर खळी जणू एक चंद्रकोर.

जसा आहे ताजमहाल या जगती,
युगे-युगे असावी तशी तू माझ्या संगती.

लावूनी बसलो मी हि खोटी आशा,
ठेच लागली हृदयी, झाली मोठी निराशा.

दूर जाता तू, मन हे तिळ तिळ तुटत होते,
व्यथा ही मनाची समजून, मेघ एकाकी बरसत होते.

आयुष्यातील ही गोड आठवण अपूर्णच का राहते?
पहिल्या प्रहरी पडलेले ते स्वप्न मजसाठी खोटे का ठरते???

प्रणव शेटये.
७२०८५५०७७१

Marathi Kavita : मराठी कविता