Author Topic: घाव  (Read 1186 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
घाव
« on: August 09, 2017, 07:26:42 PM »
:::::::: _गझल_ :::::::

°°°°°°°°° घाव °°°°°°°°°
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

एकट्याने सोसले ते घाव सारे
गाढ होते झोपलेले गाव सारे!

बेगडी ही रीत दुनिये सोड थोडी
जाणतो मी टाकलेले डाव सारे!

तोडले तू बंध सारे ज्या क्षणी हे
काळजाने सोडलेले ठाव सारे!

सोडला हा हात माझा साजनी तू
खोड हृदयी कोरलेले नाव सारे!

रोखतो मी पापणीला रोज राणी
आसवांचे बंद केले वाव सारे!

        अनिल सा.राऊत
        9890884228

Marathi Kavita : मराठी कविता


Satish Ramesh taral

  • Guest
Re: घाव
« Reply #1 on: January 28, 2018, 01:32:46 PM »
प्रेमातल्या प्रेमात खूप काही
मीळत आसतं,
आसवांनची लाट रे बाकि प्रेमात
काहि मीळत नसत..
नशीबान नशीबाशी खुप काही
खेळायच असतं,
पण नशीबाचा खेळ रे
नुसत हारायच असतं..
ती आपल्यासाठी नाहि ना
मग आपण का थांबायच,
सार कहि विसरुन फक्त
ऐक नवीन आयुष्य उभ करायचं ,,
,.कविराज सतिष तराळ ...