Author Topic: आयुष्यात एकदा तरी प्रेम जरूर करावे  (Read 741 times)

Offline maddy pathan

  • Jr. Member
  • **
  • Posts: 93
  • Gender: Male
  • Life Is Not Complicated, We Make It Complicated.
प्रेमासाठि जगाव प्रेमाखातर मराव,
त्याच्या एका हास्यावरती अवघं विश्व हराव अन अश्रुच्या थेंबालाहि डोळ्यात स्वत:च्या घ्याव,
दुखाची भागी होऊन सुख त्याच्यावर उधळाव,
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव,

तु आणि मी हे व्याकरण प्रेमात कधीच नसाव,
आपलेपणाच्या भावनेतच सार मी पण सराव,
एकमेकांच होऊन एकमेकांना जपाव,
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव,

मधुर त्याच्या आठवणीमध्ये रात्र - रात्र जागाव,
अन चुकून मिटताच पापण्या स्वप्नात तयाने याव,
बहरल्या रात्रीत चांदण्या त्याच्या विरहात झुराव,
पण खरच,
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव,

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव.

मॅडी.