Author Topic: विसरलीस तु  (Read 975 times)

Offline Dnyaneshwar Musale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Male
विसरलीस तु
« on: January 07, 2018, 09:25:52 AM »
विसरलीस तु
भांडुन भांडुन तु
माझ्याशी घेतलेली कट्टी
अनं मी हळुच मागच्या
बाकावरून दिलेली तुला चिठ्ठी.

विसरलीस तु
तुझी अपुर्ण असलेली आणि
पुर्ण करून दिलेली मी गृहपाठची वही,
अनं तुला छडी बसु नये
म्हणुन सरांची केलेली मी सही.

विसरलीस तु
माझ्या सायकलवर तुला
शाळेत घेऊन जाण,
अनं आडमोहरी रस्त्यावरून
तुझ्या मागं मागं येणं.

विसरलीस तु
जेव्हा हरवला
होता तुझा रुमाल,
अनं तो शोधण्यात
झालेली माझी धमाल.

विसरलीस तु
तुझ्या साठी लिहलेल्या
दोन ओळी,
अनं नित्य नेमाने रोज
तुझ्यासाठी आणलेली
चॉकलेटची गोळी.

विसरलीस तु
तुला दिलेला कोणमापक,
अनं तुझ्या सोबत
फिरतो म्हणुन बसलेली मला वचक.


विसरलीस तु
तुझ्यासोबत तुझ्यात
जखडलेला मी,
अन सुपातुन साळी
सारखा पाखडलेला मी.

Marathi Kavita : मराठी कविता