Author Topic: बाप  (Read 469 times)

Offline dineshnick39

  • Newbie
  • *
  • Posts: 13
बाप
« on: May 15, 2018, 03:16:01 PM »
आज मला कळलं पोटात मळ मळल
केली...माया ममतेची मणी साठवण
आज बापाची आली मला आठवण||धृ||
बापाची आठवण आज मला झाली
पुसून गेली माझ्या चेहेर्यावरची लाली
हसता चेहेरा ती गालावरची कळी
कुठं मी पाहू माझ्या नशिबाचा वाली
कसं कुणा सांगू माझी कळकळ
हरऊन गेलं सारं देवपण
आज बापाची आली मला आठवण||1||
तुला खंडेराया माझी आठवण ना आली
देऊन दुःख देवा हसतो गोड गाली
अंतरीच्या मनानी सेवा तुजी केली
बापाची छत्र छाया काडून तू नेली
कस कुणा सांगू मनाची तळमळ
घाबरत आता माझं तन मन
आज बापाची आली मला आठवण||2||
बाप आज नाही पाठी,किंमत कळाली
त्याच्याच नावी आज इज्जत मिळाली
करून मोठं पण सारीच गमवली
स्वार्थी नसता मला स्वार्थी म्हणाली
सख्खे वैरी झाले नयनीं अश्रू ढळढळ
लागलं पणाला माझं घरपण
आज बापाची आली मला आठवण||3||
नव्हतं कोणी तरी,माया त्यानं लावली
देवा तू नेली माझ्या डोक्यावरची सावली
कुठं मी शोधू सांग पुंण्याची माऊली
ज्यांनी ही दुनिया मला डोळ्यांनी दावली
झालं ग वेड माझं कूळ मूळ
मनावरी पडलं माझ्या दडपण
आज बापाची आली मला आठवण||4||
गीतकार
दिनेश दिलीप पलंगे

Marathi Kavita : मराठी कविता